या वर्षी, मागच्या काही वर्षांप्रमाणे जोधाप्रसाद मोदी मूक बधीर विद्यालयास भेट दिली. शैक्षणिक साहित्याचे प्रदान करण्यात आले. यापूर्वी या विद्यालयात दरवर्षी खाऊ, मुलांसाठी टी शर्टस, शाळेत वापरासाठी कपाटे, दूरचित्रवाणी संच अशा भेटी दिलेल्या होत्या. यावर्षी श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. नानासाहेब गाठाळ, कोषाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, सदस्य डॉ. शारंग कुलकर्णी, सदस्या सौ. वृषाली कुलकर्णी, डॉ. सौ. संपदा गिरगावकर व हितचिंतक मान्यवर पी. एस. कुलकर्णी, श्री. अविनाश मुडेगावकर यांच्यासोबत संस्थेचे अध्यक्ष मा. राजकिशोर मोदी, त्यांचा शिक्षक व कर्मचारी होते. यावेळी झालेल्या मनोगताचे कृतिचिन्हांद्वारे उपस्थित मूक बधीर विद्यार्थ्यांना आकलन करून देण्यात येत होते. कार्यक्रमाचे संयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आनंद टाकळकर यांनी केले.