GAZALMALA – commemoration of Suresh Bhat – सुरेश भट जन्मदिनानिमित्त मुशायरा – गझलमाला


Patriotic songs for prisoners / कारागृहवासियांसाठी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम


Felicitation to the teachers and cultural night – MAIFAL – on Anniversary / वर्धापनदिनानिमित्त सेवादक्ष शिक्षकांचा सन्मान व ‘मैंफल’
पहिल्या वर्धापनदिनी, उद्दिष्टांनुसार परिसरातील कलावंताना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून बालाजी सुतार यांच्या ग्रामीण व सामान्य जनतेच्या दैनंदिन प्रश्नांशी भावनिक पातळीवर गुंतलेल्या वास्तवाचे दाहक चित्रण मांडणाऱ्या ‘ गावकथा ‘ या वैशिष्ट्यपूर्ण नाट्याविष्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावर्षी दुसऱ्या वर्धापनदिनी लातूरच्या दोन स्वरोपासकांच्या – चन्द्रशेखर पारशेट्टी व डॉ. सुधीर बनशेळकीकर यांच्या, हिंदी चित्रपटगीतांचा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मोहमद रफी व किशोरकुमार यांच्या १९६० ते १९८० दरम्यानच्या सुरेल चित्रपट गीतांचा मंत्रमुग्ध करणारा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटदृश्ये, गायक, संगीतकार, गीतकार कवी, दिग्दर्शक अशा कलाकारांचा जीवनपट व निर्मितीवर अनुषंगिक रंजक माहिती व प्रसंगांचा प्रवास दृश्यपटल व निवेदनाच्या माध्यमातून सादर करण्यात आला.दृश्ययोजना शिरीष कुलकर्णी, प्रकाशयोजना संजय अयाचित, ध्वनीयोजना नूर पठाण, मंचव्यवस्था नंदकिशोर वाकडे
प्रायोजक डॉ. अजय मैंदरकर, जानाई प्रतिष्ठानचे अतुल ठोंबरे.
परिश्रम – डॉ. मुकुंद भिसे, सुनिल पाटील, प्रतिष्ठानचे कार्यकारिणी सदस्य प्रा. मनोहर कबाडे, अविनाश कुलकर्णी. याप्रसंगी १. जि.प. प्रशाला, राडीचे मुख्याध्यापक श्री. तानाजी देशमुख २.सरस्वती विद्यालय पानगाव चे वैजनाथ चामले ३. तिरुपती विद्यालय, पानगावचे बालासाहेब यादव ४. जि.प. प्रशाला पानगावचे मुख्याध्यापक जगदीश वारद ५. जि.प. प्रशाला, राडीचे मुख्याध्यापक श्री. तानाजी देशमुख ६.जि.प. प्रशाला पानगावच्या सौ. मुल्ला रुख्साना या सेवाद्क्ष शिक्षकांचा प्रतिष्ठानतर्फे सहकुटुंब सन्मान करण्यात आला.
शिक्षक आमदार मा. श्री. विक्रमजी काळे, अभिजीत देशमुख, पन्नगेश्वर सा. का. चे उपाध्यक्ष किसनराव भंडारे, नगरसेवक गुरुनाथ मगे, गझलकार अजय पांडे, प्राचार्य डॉ. दादाहरी कांबळे, बालरोग तज्ज्ञ डॉ. अशोक आरदवाड, अधिष्ठाता डॉ. जमादार, प्रतिष्ठानचे सचिव प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी.
[ngg src=”galleries” ids=”6″ display=”basic_thumbnail”]

Youth Meet for Social Workers / सामाजकार्योत्सुक तरुणांचा परिचय मेळावा