GAZAL SAMIDHA – DONATION THROUGH CONTRIBUTION OF FEES / मराठी गझल समिधा – मराठी गझलकारांच्या शुल्कनिधीत योगदानासह कोरोनाविरोधात दोन हात
सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानच्या ‘गझलमाला’ या उपक्रमांतर्गत सुरेश भट यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी १५ एप्रिल रोजी मुशायऱ्याचे आयोजन केले जाते. यावर्षी कोरोनाच्या समस्येमुळे मराठी गझल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुरेश भट यांच्या कल्पनेतील ‘विजा घेवून येणाऱ्या पिढ्यां’तील महाराष्ट्रातील कवींना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या स्पर्धेस महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. मराठी गझलकारांच्या एका पिढीचे मार्गदर्शक ज्येष्ठ गझलकार, श्री. ए. के. शेख हे परीक्षक म्हणून लाभले.
या स्पर्धेत निशा चौसाळकर (अंबाजोगाई) यांना प्रथम, तर डॉ. स्नेहल कुलकर्णी (गारगोटी) व महेश मोरे ‘स्वच्छंदी’ (सातारा) यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक जाहीर झाला. अमितकुमार खातू, (शहादा), विजयकुमार देशपांडे (सोलापूर), चैतन्य कुलकर्णी (पुणे), विनोद गहाणे (गोंदिया), केदार पाटणकर (गोवा) यांच्या गझलांची उत्तेजनार्थ निवड झाली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. नानासहेब गाठाळ व ज्येष्ठ गझलकार अजय पांडे, कवी व नाट्यकर्मी संजय अयाचित यांनी विजेत्या गझलकारांचे अभिनंदन केले.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य असे की, कोरोनाविरुद्धच्या लढाईमुळे यावेळी स्पर्धकांना पारितोषिक न देता सर्व गझलकारांच्या शुल्क निधीएवढीच प्रतिष्ठानच्या योगदानाची अधिक भर घालून १५००० रुपयांचा निधी कोरोनाविरुद्ध उभारण्यात आलेल्या पी एम केअर्स व सी एम केअर्स या निधीत प्रदान करण्यात आला.
प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्व थरातून स्वागत होत आहे.
शासन पावत्या
SAMIDHA