गझलमाला
साचेबद्ध तसेच स्वैर मराठी कवितेला वृत्तबद्ध आशयघन कवितेचा पर्याय देवून मराठी गझलने मराठी व्याकरणाला पुनरुज्जीवन दिले. आज शेकडो तरुण नव्या जाणिवांची सशक्त मराठी गझल लिहित असताना त्यांचे स्वागत, कौतुक, प्रोत्साहन व्हावे या हेतून ‘गझलमाला‘ या स्वतंत्र उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत , विशेषत: मराठी गझलविषयक विविध कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे यामध्ये आयोजन करण्यात येते. यात, मराठी गझल मार्गदर्शन, परिसंवाद, यांबरोबरच मराठी गझल गायन मैफिली, गझल गायन कार्यशाळा व शिबिरे, मराठी गझल मुशायरा, मराठी गझल विषयक प्रकाशने, संमेलने, स्पर्धा, पुरस्कार, बैठका यांचेही आयोजन करण्यात येते.
तसेच, मराठी गझलविषयक कार्य करणाऱ्या इतर संस्था, उपक्रम यांचेशी सौहार्दपूर्वक सहकार्य, सहभाग व साह्यभूतता राखण्यात येते.