मराठी विज्ञान परिषद
विज्ञान जीवनाभिमुख व जीवन विज्ञानाभिमुख व्हायला हवे. त्यासाठी मातृभाषेतून विज्ञानाचा प्रसार व्हायला हवा. विज्ञानाची ओळख सतत ठेवली पाहिजे. त्यासाठी नागरिकांसह विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विविध शाळांतील विद्यार्थ्यांना त्याची जाणीव करून देणे व ती अधिकाधिक डोळस करणे, यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी व नागरीक यांच्या विज्ञानाभिमुखतेसाठी मराठी विज्ञान परिषद या नामांकित संस्थेचा विभाग पाबगाव येथे सुरु करण्यात आला. लातूर जिल्ह्यात हा एकमेव ग्रामीण विभाग आहे. त्या अंतर्गत विज्ञानाच्या प्रसारासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात.
मराठी विज्ञान परिषद विभाग स्थानिक कार्यकारिणी
परिषदेचा विभाग -संस्थे अंतर्गत
Marathi Vidnyan Parishad – Activity