सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानचा शालेय विज्ञान उपक्रम
मराठी विज्ञान परिषदेच्या ‘विज्ञानवारी’स पानगाव व परिसरात उत्साहाने सुरुवात
विज्ञान ही जीवनशैली झाली पाहिजे, त्यासाठी त्याचा
प्रसार मातृभाषेतून झाला पाहिजे व ग्रामीण भागात तो प्राधान्याने झाला पाहिजे, या जाणिवेतून सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानच्या अंतर्गत मराठी विज्ञान परिषदेच्या पानगाव विभागातर्फे, मराठी विज्ञान परिषद (मुंबई) च्या वतीने राबविण्यात येणार्या ‘शनिवारी विज्ञानवारी’ या उपक्रमाची दि. १३ सप्टेंबर पासून अतिशय उत्साहात करण्यात आली. या उपक्रमात पानगाव व परिसरातील सात शाळांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्यात आला असून त्याअंतर्गत ग्रामीण भागातील शालेय अभ्यासक्रमास पूरक तसेच इतर वैज्ञानिक तत्वांची तोंडओळख छोट्या छोट्या पण अभिनव प्रयोगांच्या माध्यमातून करून देण्यात येते. या उपक्रमात लातूर व रेणापूर येथील महाविद्यालयांतील वैभव सरडे, संदीप घोणे, ऋषिकेश इरलापल्ले, ज्ञानोबा पंडगे,
अशोक दळवे, मंगेश माने, कृष्णकांत केंद्रे, माधव तोंडारे, श्वेता चव्हाण, भाग्यश्री चेपट, प्रद्युम्न इंगळे, ओंकार चोथवे, लक्ष्मीकांत जायेभाये, वैभव पाटील व अमरदीप कुसंगे या विद्यार्थ्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या प्रशिक्षित साधन व्यक्ति म्हणून सहभाग घेतला. या सर्व विद्यार्थ्यांना मराठी विज्ञान परिषदेच्या मुंबई विभागातर्फे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमात पानगाव येथील सरस्वती विद्यालय, तिरुपती विद्यालय, जि. प. प्रशाला (क्र.१ व २), स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, जि. प. केंद्रीय विद्यालय, तसेच शिवाजी विद्यालय (भंडारवाडी- पाथरवाडी) व पद्मावती विद्यालय (मुरढव) यांचा यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. या उपक्रमाचे समन्वयक प्रा. मनोहर कबाडे व प्रतिष्ठानचे सचिव प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी यांच्यासह सर्वश्री. वैजनाथ चामले, बालासाहेब यादव, जगदीश वारद, महारुद्र (बाबा) हालकुडे, रमेश जाधव, मधुकरराव कुलकर्णी, राजेश गोकुळे, वैजनाथ खंदाडे, आर. सी. पाटील, यू. एम. पाटील, बी. एस. सूर्यवंशी, सौ. महानंदा गिते, सौ. भगवती चव्हाण, सौ. मुल्ला रुक्साना मैनोद्दीन इ. शिक्षक व मुख्याध्यापक परिश्रम घेत आहेत. प्रा. शंकर यादव, प्रा. अभिजीत पत्की, प्राचार्य अवस्थी यांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आहे.
————————————————————————————————————————-
हा प्रकल्प चार शाळांतून दहा शनिवारी कृतिसत्रे आयोजित करून पूर्ण करण्यात आला. कृतिसत्रे पूर्ण करणाऱ्या विज्ञान प्रसारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन !
कु. श्वेता चव्हाण व भाग्यश्री चेपट (शाहू महाविद्यालय, लातूर) यांनी पानगाव येथील तिरुपती विद्यालयात, तर वैभव सरडे व संदीप घोणे यांनी सरस्वती विद्यालयात, ऋषिकेश इरलापल्ले व ज्ञानोबा पंडगे यांनी जि. प. प्रशालेत व कृष्णकांत केंद्र व माधव तोंडारे यांनी विवेकानंद विद्यालयात ही कृतिसत्रे पूर्ण केली. या विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसही अक्षरश: जिव्हाळा निर्माण करून त्यांना विज्ञानाचे सप्रयोग पाठ दिले. काही शाळांतील विद्यार्थ्यांनी कृतिसत्रे पूर्ण झाल्यावर अक्षरशः भावुक होवून निरोप दिला. प्रा. मनोहर कबाडे यांनी या ‘विज्ञानवारी’चे यशस्वी समन्वयन केले. या उपक्रमाची काही क्षणचित्रे ….
[ngg src=”galleries” ids=”5″ display=”basic_imagebrowser”]